तथागत गौतम बुद्ध
🍂📖🌄🍃🍂📖🌄🍃🍂📖🌄 🍂सुवर्णपानं इतिहासाची🍂 तथागत गौतम बुद्ध (ई.पू.563-ई.पू.483) अवघ्या जगाला शांतीचा संदेश देणारे,बौद्ध धर्माचे आद्य संस्थापक तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म नेपाळ लुम्बिनी येथे शाक्य कुळात झाला.त्यांचे 'सिद्धार्थ' असे नाव होते.वडील शुद्धोधन,आई महामाया होती.जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशी महामाया यांचे निधन झाले.आई छत्र हरवलेल्या बुद्धांचे पूर्ण पालनपोषण सावत्र आई महाप्रजापती गौतमी यांनी केले.म्हणून त्यांना गौतम असेही म्हणत.राजकुमार असलेल्या सिद्धार्थ लहान असतांना विद्वानांची भविष्यवाणीने राजा शुद्धोधनाची चिंता वाढवून गेली."हा मुलगा मोठा झाल्यावर महान राजा होईल अन्यथा महान धर्म गुरू होईल". विद्वानांची भविष्यवाणी आणि राजा शुद्धोधनाची चिंता नवीन महान प्रेषित घडवणार होती.राजा शुद्धोधनाची सिद्धार्थ राजा व्हावा यासाठी बाहेरच्या जगाशी अजिबात संपर्क होऊ दिला नाही.सर्व सोयीसुविधा राजवाड्यातच करून ठेवल्या.जगात सर्वदूर सुख आहे.आनंद आहे आणि हेच जीवन आहे.दुःख,यातन...