Posts

Showing posts from May, 2019

छत्रपती संभाजीराजे भोसले

Image
🚩⚔⛳🚩⚔⛳🚩⚔⛳🚩⚔ 🗞 लोकल Citizen 🗞 🍂 सुवर्णपानं इतिहासाची🍂 ⛳ छत्रपती संभाजीराजे भोसले⛳ 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 https://localcitizen.page.link/WxA11pHg3TbwVLMEA 'लोकल Citizen' या डिजीटल वृत्तपत्रात आज दि.१४ मे रोजी 'सुवर्णपानं इतिहासाची' या लेखमालिकेतील 'छत्रपती संभाजीराजे भोसले' यांच्या जयंतीनिमित्ताने प्रकाशित झालेला लेख...! Thanks....! लोकल Citizen Team 🚩⚔⛳🚩⚔⛳🚩⚔⛳🚩⚔ 🍂 सुवर्णपानं इतिहासाची🍂 छत्रपती संभाजीराजे भोसले (१४ मे १६५७- ११ मार्च १६८९)        स्वराज्य रक्षक,शत्रूशी समर्थपणे व प्राणपणाने लढणारे धर्मवीर,स्वाभिमानी,महापराक्रमी,छत्रपती शिवरायांचा छावा,धैर्यशील छत्रपती संभाजी राजे यांचा जन्म किल्ले पुरंदर येथे १४ मे १६५७ मध्ये झाला.ते लहान असतानांच त्यांच्या मातोश्री सईबाईंचे निधन झाले.पुढे त्यांचा सांभाळ स्वराज्याची आई त्यांची आजी जिजाबाई यांनी केला.        संभाजीराजे खूप शूर होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या सावलीत वाढत असल्याने रणांगणावरील मोहिमा,राजकिय डावपेच,स्वराज्याचे रक्षण यांचे बा...

भारताचा वीरपुत्र महाराणा प्रताप

Image
🍂 सुवर्णपानं इतिहासाची🍂 भारताचा वीरपुत्र महाराणा प्रताप (९ मे १५४० - १९ जानेवारी १५९७)     भारतपुत्र,मेवाड नरेश,देशभक्ती,स्वाभिमान,साहस,संघर्ष,दृढसंकल्प,मातृभूमी रक्षक,क्षत्रिय महाराणा प्रताप हे भारतीय इतिहासाला लाभलेलं सुवर्णपान.भारतीय इतिहासातील महान राजांपैकी एक असलेले महाराणा प्रताप यांचा जन्म राजपूत सिसोदिया वंशात उदयपूरचे संस्थापक राणा उदयसिंह व्दितीय आणि महाराणी जयवंताबाई यांच्या घरी कुंभलगड येथे झाला.महाराणा प्रतापांना लहानपणी 'कीका' नावाने हाक मारत असत.       महाराणा प्रताप हे वीर बालक होते.लहानपणापासूनच वडिलांपासून त्यांना स्वातंत्र्य,शौर्य आणि स्वाभिमान हे गुण मिळाले.त्यांना विविध खेळ खेळणे आणि घोडेस्वारी यांची खूप आवड होती.थोरले राजपुत्र असल्याने जनतेत त्यांच्या कतृत्वाची चर्चा होत होती.विविध शस्रास्रे चालविणे,शत्रूवर चढाई करणे यात ते तरबेज होत होते.आपल्या विविध गुणांमुळे त्यांनी आपल्या वडीलांचे मन जिंकले होते.महाराणा प्रतापांना शक्तीसिंह नावाचा भाऊ होता.महाराणा प्रतापांचा त्यास हेवा वाटे.      एकदा अफगाणी व्यापारी घोडे घेऊ...

पृथ्वीराज चव्हाण

Image
सुवर्णपानं इतिहासाची  पृथ्वीराज चौहान इ.स.११६३ - इ.स.११९२       आर्यावर्त भारताची शौर्याची आणि संस्कृतीची गौरवशाली परंपरा खूप मोठी आहे.त्यात 'राजपूताना' इतिहास आपणास प्रभावित करित असतो.राजपूतान्याचा संबंध इतिहास शौर्य,त्याग,बलिदान यांनी भरलेला आहे.या कीर्तीस्तंभ  म्हणून सर्वात आकर्षित करत असलेलं इतिहासाचं सुवर्णपान म्हणजे दिल्लीचं तख्त राखणारे शेवटचे हिंदूसम्राट,राय पिथौरा,भारतेश्वर अशा नावांनी ओळखले गेलेले पृथ्वीराज चौहान.         राजपूत इतिहासातील चाहमन तथा चौहान घराण्यात प्रसिद्ध असलेला राजा सोमेश्वर यांना पृथ्वीराज व हरिराज अशी दोन मुलं व पृथा नावाची मुलगी होती.पृथ्वीराज वडिलांच्या मृत्यूनंतर वयाच्या दहाव्या वर्षी गादीवर बसले.आई कर्पूरदेवी यांनी कदंबवास या विश्वासू मंत्र्याच्या सहाय्याने राज्यकारभार चालविला.युद्धातील अनेक अनमोल गुण त्यांच्यात होते.युद्ध कुशल असलेले पृथ्वीराज यांचं शब्दभेदी बाणचं कौशल्य आणि धर्नुविद्या अभ्यास चांगला होता.विविध भाषांचा त्यांचा अभ्यास होता.       त्या दिवसात दिल्लीचा कार...

चक्रवर्ती सम्राट अशोक

Image
सुवर्णपानं इतिहासाची चक्रवर्ती सम्राट अशोक  (इ.स.पू ३०४ - इ.स.पू.२३२)       प्राचीन भारतापासून आजतागायत महान आणि शक्तिशाली सम्राटांमध्ये सर्वोच्च स्थानावर असलेले चक्रवर्ती सम्राट अशोक यांचा जन्म धर्मा व बिंदूसार यांच्या मौर्य राजपरिवारात झाला.लहानपणापासून अशोक  खोडकर,तापट,चांगले शिकारी होते.सेनानी बनण्याचे गुण असल्याने बिंदूसारने त्यांस अवंतीचा उठाव मोडण्यास पाठविले होते.त्यांनी ते सहज मोडून काढले.अनेक मोहिमा यशस्वी केल्याने त्यांचे राजदरबारातील नेतृत्व आणि लौकिक वाढत गेले.राज्यभर कीर्ती वाढत गेली.कौटुंबिक कलहावर यशस्वीरित्या मात करत बिंदूसार यांच्या मृत्यूनंतर मगध साम्राज्याचा सम्राट बनले.         राज्यरोहण झाल्यानंतर अवघ्या आठ वर्षाच्या काळात अनेक प्रदेश सम्राट अशोकांनी मगध साम्राज्यास जोडले.दक्षिणेस केरळ,उत्तरेस अफगणिस्तान,पूर्वेस ब्रम्हदेश तर पश्चिमेस बलुचिस्तान इराणपर्यंत साम्राज्यविस्तार सम्राट अशोकांनी केला.एकछत्री सत्ता लागू केली.अशोकांची महत्त्वाकांक्षा वाढतच गेली.शेजारचे सर्व राज्य त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध राखत...