Posts

छत्रपती शिवाजी महाराज

Image
🍂🍁🍂🍁🍂🍁🍂🍁🍂🍁🍂 🍂  सुवर्णपानं इतिहासाची 🍂 ⛳  छत्रपती शिवाजी महाराज  ⛳ (इ.स.१९ फेब्रुवारी १६३० - ३ एप्रिल १६८०)          हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,आदर्श शासनकर्ता,सर्वसमावेशक सहिष्णू राजा,निष्ठावान,पराक्रमी,रयतेचा धनी,निश्चयाचा महामेरू,बहुतजनांसी आधारू,अखंडस्थितीचा निर्धारू,श्रीमंतयोगी,जाणता राजा,प्रौढ प्रताप पुरंदर...क्षत्रिय कुलावंतस्...सिंहासनाधिश्वर... महाराजधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला.त्यांच्या आई राजमाता जिजाऊ आणि वडील शहाजी राजे भोसले होते.शिवाई देवीच्या नावावरून महाराजांचे "शिवाजी" असे नामकरण करण्यात आले.           महाराजांच्या बालमनावर उत्तम संस्कार राजमाता जिजाऊंनी केले.लहानपणीच रामकृष्णाच्या,शुरवीरांच्या गोष्टी राजमाता सांगत असत.तलवारबाजी,युद्धकौशल्य,नितीशास्र यात त्यांना ते तरबेज करत होत्या.शहाजी राजे भोसले यांनी त्यांच्यावर रणनिती व युद्धाभ्यासाचे संस्कार केले.जिजाऊंनी पुण्याचा कारभार पाहत असतांनांच हिंदव...

छत्रपती संभाजीराजे भोसले

Image
🚩⚔⛳🚩⚔⛳🚩⚔⛳🚩⚔ 🗞 लोकल Citizen 🗞 🍂 सुवर्णपानं इतिहासाची🍂 ⛳ छत्रपती संभाजीराजे भोसले⛳ 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 https://localcitizen.page.link/WxA11pHg3TbwVLMEA 'लोकल Citizen' या डिजीटल वृत्तपत्रात आज दि.१४ मे रोजी 'सुवर्णपानं इतिहासाची' या लेखमालिकेतील 'छत्रपती संभाजीराजे भोसले' यांच्या जयंतीनिमित्ताने प्रकाशित झालेला लेख...! Thanks....! लोकल Citizen Team 🚩⚔⛳🚩⚔⛳🚩⚔⛳🚩⚔ 🍂 सुवर्णपानं इतिहासाची🍂 छत्रपती संभाजीराजे भोसले (१४ मे १६५७- ११ मार्च १६८९)        स्वराज्य रक्षक,शत्रूशी समर्थपणे व प्राणपणाने लढणारे धर्मवीर,स्वाभिमानी,महापराक्रमी,छत्रपती शिवरायांचा छावा,धैर्यशील छत्रपती संभाजी राजे यांचा जन्म किल्ले पुरंदर येथे १४ मे १६५७ मध्ये झाला.ते लहान असतानांच त्यांच्या मातोश्री सईबाईंचे निधन झाले.पुढे त्यांचा सांभाळ स्वराज्याची आई त्यांची आजी जिजाबाई यांनी केला.        संभाजीराजे खूप शूर होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या सावलीत वाढत असल्याने रणांगणावरील मोहिमा,राजकिय डावपेच,स्वराज्याचे रक्षण यांचे बा...

भारताचा वीरपुत्र महाराणा प्रताप

Image
🍂 सुवर्णपानं इतिहासाची🍂 भारताचा वीरपुत्र महाराणा प्रताप (९ मे १५४० - १९ जानेवारी १५९७)     भारतपुत्र,मेवाड नरेश,देशभक्ती,स्वाभिमान,साहस,संघर्ष,दृढसंकल्प,मातृभूमी रक्षक,क्षत्रिय महाराणा प्रताप हे भारतीय इतिहासाला लाभलेलं सुवर्णपान.भारतीय इतिहासातील महान राजांपैकी एक असलेले महाराणा प्रताप यांचा जन्म राजपूत सिसोदिया वंशात उदयपूरचे संस्थापक राणा उदयसिंह व्दितीय आणि महाराणी जयवंताबाई यांच्या घरी कुंभलगड येथे झाला.महाराणा प्रतापांना लहानपणी 'कीका' नावाने हाक मारत असत.       महाराणा प्रताप हे वीर बालक होते.लहानपणापासूनच वडिलांपासून त्यांना स्वातंत्र्य,शौर्य आणि स्वाभिमान हे गुण मिळाले.त्यांना विविध खेळ खेळणे आणि घोडेस्वारी यांची खूप आवड होती.थोरले राजपुत्र असल्याने जनतेत त्यांच्या कतृत्वाची चर्चा होत होती.विविध शस्रास्रे चालविणे,शत्रूवर चढाई करणे यात ते तरबेज होत होते.आपल्या विविध गुणांमुळे त्यांनी आपल्या वडीलांचे मन जिंकले होते.महाराणा प्रतापांना शक्तीसिंह नावाचा भाऊ होता.महाराणा प्रतापांचा त्यास हेवा वाटे.      एकदा अफगाणी व्यापारी घोडे घेऊ...

पृथ्वीराज चव्हाण

Image
सुवर्णपानं इतिहासाची  पृथ्वीराज चौहान इ.स.११६३ - इ.स.११९२       आर्यावर्त भारताची शौर्याची आणि संस्कृतीची गौरवशाली परंपरा खूप मोठी आहे.त्यात 'राजपूताना' इतिहास आपणास प्रभावित करित असतो.राजपूतान्याचा संबंध इतिहास शौर्य,त्याग,बलिदान यांनी भरलेला आहे.या कीर्तीस्तंभ  म्हणून सर्वात आकर्षित करत असलेलं इतिहासाचं सुवर्णपान म्हणजे दिल्लीचं तख्त राखणारे शेवटचे हिंदूसम्राट,राय पिथौरा,भारतेश्वर अशा नावांनी ओळखले गेलेले पृथ्वीराज चौहान.         राजपूत इतिहासातील चाहमन तथा चौहान घराण्यात प्रसिद्ध असलेला राजा सोमेश्वर यांना पृथ्वीराज व हरिराज अशी दोन मुलं व पृथा नावाची मुलगी होती.पृथ्वीराज वडिलांच्या मृत्यूनंतर वयाच्या दहाव्या वर्षी गादीवर बसले.आई कर्पूरदेवी यांनी कदंबवास या विश्वासू मंत्र्याच्या सहाय्याने राज्यकारभार चालविला.युद्धातील अनेक अनमोल गुण त्यांच्यात होते.युद्ध कुशल असलेले पृथ्वीराज यांचं शब्दभेदी बाणचं कौशल्य आणि धर्नुविद्या अभ्यास चांगला होता.विविध भाषांचा त्यांचा अभ्यास होता.       त्या दिवसात दिल्लीचा कार...

चक्रवर्ती सम्राट अशोक

Image
सुवर्णपानं इतिहासाची चक्रवर्ती सम्राट अशोक  (इ.स.पू ३०४ - इ.स.पू.२३२)       प्राचीन भारतापासून आजतागायत महान आणि शक्तिशाली सम्राटांमध्ये सर्वोच्च स्थानावर असलेले चक्रवर्ती सम्राट अशोक यांचा जन्म धर्मा व बिंदूसार यांच्या मौर्य राजपरिवारात झाला.लहानपणापासून अशोक  खोडकर,तापट,चांगले शिकारी होते.सेनानी बनण्याचे गुण असल्याने बिंदूसारने त्यांस अवंतीचा उठाव मोडण्यास पाठविले होते.त्यांनी ते सहज मोडून काढले.अनेक मोहिमा यशस्वी केल्याने त्यांचे राजदरबारातील नेतृत्व आणि लौकिक वाढत गेले.राज्यभर कीर्ती वाढत गेली.कौटुंबिक कलहावर यशस्वीरित्या मात करत बिंदूसार यांच्या मृत्यूनंतर मगध साम्राज्याचा सम्राट बनले.         राज्यरोहण झाल्यानंतर अवघ्या आठ वर्षाच्या काळात अनेक प्रदेश सम्राट अशोकांनी मगध साम्राज्यास जोडले.दक्षिणेस केरळ,उत्तरेस अफगणिस्तान,पूर्वेस ब्रम्हदेश तर पश्चिमेस बलुचिस्तान इराणपर्यंत साम्राज्यविस्तार सम्राट अशोकांनी केला.एकछत्री सत्ता लागू केली.अशोकांची महत्त्वाकांक्षा वाढतच गेली.शेजारचे सर्व राज्य त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध राखत...

आर्य चाणक्य

Image
🗞 दैनिक मालेगावचा बालेकिल्ला 🗞 दि.२५ सप्टेंबर २०१८ 🍂 सुवर्णपानं इतिहासाची 🍂 आर्य चाणक्य अंदाजित - इ.स.पू.३७५-इ.स.पू.२८३    अखंड भारताचे स्वप्नं ज्यांनी अंतिम श्वासापर्यंत बाळगलं,परकीयांचा प्रखर विरोध करून पारतंत्र्यांचे भविष्यातील होणारे परिणाम लक्षात घेऊन भारतीय राजांना स्वातंत्र्याचा अर्थ सांगणारे,प्रत्यक्ष मदत करणारे थोर विचारवंत,अर्थशास्त्र आणि राजनिती या विषयावर मानवी जीवनाला दिशादर्शक ठरणारा 'चाणक्यनिती' वा 'दंडनिती' हा ग्रंथ लिहणारे व अंमलात आणणारे थोर आचार्य,बुद्धीवंत,किर्तीवंत,नेतृत्वकर्ते,इतिहासात चाणक्य,विष्णुगुप्त तथा कौटिल्य या नावांनी ओळखले जाणारे आर्य चाणक्य हे प्राचीन भारताला पडलेलं भव्यदिव्य वास्तवातील स्वप्नंच...!        इतिहास नाकारू शकत नाही असं व्यक्तीमत्व आर्यावर्त असलेल्या भारतात झालं.भलेही त्यांच्या जन्माविषयी,जीवनातील घडामोडींविषयी इतिहासात एकमत नसेल,पण त्यांनी दिलेली आपल्या आयुष्यातील आहुती संपूर्ण भारताला प्रेरणादायी,मार्गदर्शक ठरलेली आहे.          नंद राजवटीतील पाटलीपुत्र येथे चाणक्य त...

वर्धमान महावीर

Image
♻⚜🍂♻⚜🍂♻⚜🍂♻⚜ सुवर्णपानं इतिहासाची भगवान महावीर (इ.स.पू.599- इ.स.पू 527)    अहिंसेचे प्रतिक,जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर होय.जैन धर्म तेवीसवे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांच्या निधनाच्या 278 वर्षानंतर महावीरांचा जन्म झाला.भगवान ऋषभ देवांपासून तीर्थंकरांची सुरू झालेली परंपरा शेवटचे तीर्थंकर म्हणून महावीरांपर्यंत येऊन पोहोचते.        वर्धमान महावीरांचा जन्म अडीच हजार वर्षापूर्वी वैशाली गणराज्याच्या कुंडग्राम या गावी झाला.महावीरांचे मूळ नाव वर्धमान असे होते.त्यांचे वडील सिद्धार्थ तर आई त्रिशला होती.त्यांच्या भावाचे नाव नंदिवर्मन तर बहिणीचे नाव सुदर्शना होते.त्यांचे बालपण राजेशाही थाटात गेले.कल्पनासुत्र नावाच्या ग्रंथात वर्धमान महावीरांच्या जन्मोत्सवाविषयी व घडलेल्या घटनांविषयी माहिती आहे.जैन ग्रंथ उत्तरपुराणात वर्धमान,वीर,अतिवीर,महावीर आणि सन्मति अशा त्यांच्या पाच नावांचा उल्लेख आहे.         दिगंबर पंथाच्या म्हणण्यानुसार भगवान महावीर ब्रम्हचारी होते,तर श्वेतांबर पंथानुसार त्यांचा यशोदा यांच्याशी झाल...