छत्रपती संभाजीराजे भोसले


🚩⚔⛳🚩⚔⛳🚩⚔⛳🚩⚔

🗞 लोकल Citizen 🗞

🍂 सुवर्णपानं इतिहासाची🍂
⛳ छत्रपती संभाजीराजे भोसले⛳

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://localcitizen.page.link/WxA11pHg3TbwVLMEA

'लोकल Citizen' या डिजीटल वृत्तपत्रात आज दि.१४ मे रोजी 'सुवर्णपानं इतिहासाची' या लेखमालिकेतील 'छत्रपती संभाजीराजे भोसले' यांच्या जयंतीनिमित्ताने प्रकाशित झालेला लेख...!

Thanks....!
लोकल Citizen Team

🚩⚔⛳🚩⚔⛳🚩⚔⛳🚩⚔

🍂 सुवर्णपानं इतिहासाची🍂

छत्रपती संभाजीराजे भोसले
(१४ मे १६५७- ११ मार्च १६८९)

       स्वराज्य रक्षक,शत्रूशी समर्थपणे व प्राणपणाने लढणारे धर्मवीर,स्वाभिमानी,महापराक्रमी,छत्रपती शिवरायांचा छावा,धैर्यशील छत्रपती संभाजी राजे यांचा जन्म किल्ले पुरंदर येथे १४ मे १६५७ मध्ये झाला.ते लहान असतानांच त्यांच्या मातोश्री सईबाईंचे निधन झाले.पुढे त्यांचा सांभाळ स्वराज्याची आई त्यांची आजी जिजाबाई यांनी केला.

       संभाजीराजे खूप शूर होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या सावलीत वाढत असल्याने रणांगणावरील मोहिमा,राजकिय डावपेच,स्वराज्याचे रक्षण यांचे बाळकडू त्यांना मिळत होते.दंडनिती,शस्रविद्या,तालीम,तिरंदाजी,घोड्यावर बसणे इ.चे शिक्षण त्यांना लहानपणीच मिळाले.त्यांचा विवाह पिलाजीराव शिर्के यांची कन्या येसूबाईंसोबत झाला.ते नऊ वर्षाचे असतांना त्यांना आग्रा भेटीकरिता छत्रपती शिवाजी राजेंनी सोबतच नेले होते.वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी संस्कृत ग्रंथ 'बुधभूषणम्' लिहला.तसेच ब्रज भाषेतील 'सातसतक','नखशिख','नायिकाभेद' असे ग्रंथ लिहले.त्यांच्या अभ्यासूवृत्तीविषयी अनेक प्रसंग इतिहासात आहेत. शिवराज्यभिषेकावेळी हेन्री अॉक्सीटेन नावाचा इंग्रज वकील उपस्थित होता.त्याने त्याच्या पुस्तकात लिहून ठेवलंय की संभाजी राजेंचे तब्बल १४ भाषेंवर प्रभूत्व होतं.

         छत्रपतींसोबत स्वराज्याचे रक्षण करणे,मोहिमा राबविणे हे नित्याचेच होते.वयाच्या सतराव्या वर्षी छत्रपती शंभूराजेंनी फोंडा किल्ला घेण्यात मोलाची भूमिका पार पाडली होती.अनेक मोहिमांमध्ये यशस्वी झाल्याने,स्वराज्याचे पुढील छत्रपती व मराठा साम्राज्याची धुरा सांभाळण्याची क्षमता युवराजांमध्ये आहे हे छत्रपती शिवरायांना कळून चुकले होते.एॕबे कॕरे नावाच्या फ्रेंच प्रवासी १६७२ मध्ये लिहून ठेवतो - "हा युवराज लहान असला तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे.महाराजांसोबत राहून युद्धनिती समजून घेत आहे.मजबूत,रूपवान असलेल्या संभाजीविषयी सैनिकांत आकर्षण आहे.सैनिकांचे फार प्रेम आहे,मान देतात व विशेष म्हणजे त्यांच्या हाताखाली लढण्यात सैनिक धन्यता मानतात." यावरून संभाजी राजेंची लोकप्रियता लक्षात येते.१६८० मध्ये छत्रपती शिवाजी राजेंचे निधन झाले आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी अनेक राजकीय घडामोडींनंतर स्वराज्याची जबाबदारी १६८१ मध्ये रायगड येथे विधीवत राज्याभिषेक करून आपल्या हातात घेतली.प्रधानमंडळ तयार करत पत्नी येसूबाई यांनाही त्यात सहभागी करून घेतले.कवी कलश यांना छंदोगामात्य या पदावर बसविले.स्वराज्याचा कारभार ते प्रधानमंडळच्या सल्ल्याने करू लागले.

        रायगडावर स्थिरस्थावर झाल्यानंतर त्यांचा बहुतेक काळ शत्रूशी युद्ध करण्यातच गेला.त्यांना मोगल,सिद्धी,इंग्रज,डच,पोर्तुगीज या मातब्बर शत्रूंशी मुकाबला करावा लागला.औरंगजेबाचा मुलगा अकबर यांस राजेंनी आश्रय दिला होता.संभाजी राजेंनी नौदल व आरमार मोठ्या प्रमाणात वाढविले.चार्तुयाने त्यांनी आदिलशहा,कुतुबशहा यांच्या मदतीने औरंगजेबशी निकराने लढा दिला.बर्हाणपूर मराठ्यांनी लुटले.दक्षिणेत शाहआलमचा मराठ्यांनी पराभव केला.संभाजीराजांची पूर्ण कारकिर्द मोगलांविरूद्ध लढण्यात गेली.औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत जास्त होते.सैन्य पाचपट,राज्य १५ पटापेक्षा जास्त,शक्तीशाली सैन्य,संपत्ती असे जरी असले तरी संभाजीराजेंनी प्रबळ इच्छाशक्ती व धाडसाने नेतृत्व केले.रामशेज किल्ला त्यांनी तब्बल सहा वर्षे लढवाला.त्यांनी आपल्या स्वराज्याची राज्यव्याप्ती पश्चिम महाराष्ट्र,कोकण,सह्याद्रीपासून नागपूरपर्यंत,उत्तर महाराष्ट्र,खान्देशापासून दक्षिण भारतात तंजावरपर्यंत वाढविली.पोर्तुगीजांच्या गोव्यातील धर्मांतराला,धर्मप्रसाराला विरोध केल्यावर इंग्रजांशी झालेल्या पत्रात पोर्तुगीज लिहितात,"सध्याच्या परिस्थितीत संभाजी महाराज हेच सर्वशक्तीमान आहेत असा आमुचा अनुभव आहे." हे पत्रच संभाजी राजेंचे सामर्थ्य अधोरेखित करते.

      १६८९ च्या सुरूवातीला संगमेश्वर येथील महत्त्वाची बैठक आटोपल्यानंतर दगाफटक्याने संभाजी राजेंना जीवंत पकडण्यात आले.शुरवीर,नरवीर संभाजीराजें यांचे अतोनात हाल औरंगजेबाने केले.सतत ४० दिवस अत्याचार केले तरीही स्वराज्याच्या अभिमानासाठी न झुकणारा अजिंक्य योद्धा,धर्मवीर संभाजीराजांचा ११ मार्च १६८९ रोजी भीमा इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली अवघ्या बत्तीसाव्या वर्षी.पुणे जिल्ह्यातील तुळापूर वढू येथे छत्रपती संभाजी राजांची समाधी आहे.

         स्वराज्याचे पहिले युवराज,मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे भोसले हे आजही स्वाभिमानाचे प्रतीक आहेत.जहाज बांधणी कारखाने,तरंगता तोफखाना,स्वदेशीचा महामंत्र,स्वराज्याची रक्षा करणारा,सर्व धर्मांचा मान राखणारा,धर्मांतरावर बंदी घालणारा,दुष्काळग्रस्तांसाठी कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करणारा,स्वराज्याला आर्थिक संपन्न करणारा छत्रपती म्हणून ओळख निर्माण करणारा छावा हे नेहमीच ऊर्जादायी आहेत.मराठा साम्राज्याचं हे इतिहासाचं अनमोल सुवर्णपानंच....!
म्हणूनच म्हणावेसे वाटते...!

देश धरम पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था।
महापराक्रमी परमप्रतापी,एक ही शंभू राजा था।।
मातृभूमी के चरण कमल पर,जीवन पुष्प चढाया था।
है दुजा दुनिया में कोई,जैसा शंभूराजा था।।

-
भरत विठ्ठल पाटील
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीनगर
ता.मालेगाव जि.नाशिक
9665911657
bharatpatil7988@gmail.com

Comments

Popular posts from this blog

छत्रपती शिवाजी महाराज

वर्धमान महावीर